प्रकाश आंबेडकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार.. म्हणाले, मंदिरं लवकरच उघडणार

file photo


वेब टीम : पंढरपूर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेनेसोबत मिळून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपूरात आंदोलन केले. 


यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पंढरपूरात दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला. 


काल रात्रीपासून सोलापूर-पंढरपूर मार्गासह पंढरपूरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


शिवाजी चौकात कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं. या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांनी देखील समर्थन दिले होते. 


तर, मंदिरातील बडवे मंडळींनी विठ्ठलाची मूर्ती देऊन प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले.  


त्यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. 


यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनभावनेचा आदर केला असून, राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्यात येतील, असं त्यांनी आश्वासन दिल असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले.


 

दरम्यान, राज्यातील मंदिरे बंद ठेवणं हे काही कोणी आनंदानं करत नाही आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. 


लवकरच मंदिरं, रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 


विरोधी पक्षाने राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील, अशी शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post