मोबाईलवरून म्हणाला, तलाक.. तलाक.. तलाक.. अन् पोलिसांनी केले चतुर्भुज...वेब टीम : भिवंडी

मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे आण, अशी मागणी करणाऱ्या सुभान आजम खान याने या वादात पत्नीला मोबाईलवरून तीन तलाक दिला होता. 


त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


हकिकत अशी की, सुभान खान याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 


सुभान स्वतः आणि त्याची बहीण हुस्नतारा हे विवाहितेला मारझोड करून तिचा छळ करत होते. 


सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत होता. नंतर, मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून तो पत्नीच्या मागे लागला होता. 


यासाठी तो पत्नीला मारहाण करायचा आणि तिचा मानसिक छळही करायचा.


वाद वाढत गेला. सुभानने २४ ऑगस्टला रात्री ११ च्या सुमारास पत्नीला मोबाईलवरून फोन केला. 


शिव्या दिल्या आणि मोबाईलवरूच तीन तलाक दिला. 


सुभानच्या पत्नीने याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. 


पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४ अंतर्गत मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्या अंतर्गत कलम ४ नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला; सुभानला अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post