अजित दादा- फडणवीस आले एकाच मंचावर... दादा म्हणाले, 'ही तर महाराष्ट्राची परंपरा...'वेब टीम : पुणे

पुण्यातील बाणेर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 


फडणवीस आणि अजितदादा एकाच मंचावर येणार असल्याने याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. 


दोघेही पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.


मात्र, संकटाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर त्यात गैर काय, असं मिस्कील भाष्य अजित पवार यांनी केलं.


उद्घाटन प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर का आले, यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 


मात्र आम्ही एका मंचावर येण्याची ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाते. 


त्यांना चंद्रकांत पाटीलही येणार असल्याची माहिती नव्हती वाटतं, असा टोला त्यांनी माध्यमांना लगावला.


तसेच संकटकाळात राज्यातील सत्ताधारी-विरोधक एकत्र येऊनच सामना करतात, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. 


आज कोरोनाशी लढा सुरू असल्याची आठवण अजित पवार यांनी यावेळी सगळ्यांना करून दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post