वेब टीम : पुणे राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. उद्या (शुक्रवारी) विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर कोकण आणि गोव्यात...
वेब टीम : पुणे
राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे.
उद्या (शुक्रवारी) विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने गुरूवारी दिला आहे.
राज्यात आणखी आणखी चार दिवस कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम असणार आहे.
परवा (शनिवारी) कोकण, गोव्यात जोरदार पाऊस असणार आहे.
तर मध्य महाराष्ट्रातील घाट माथा विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातही बहुतांश भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
मागील 24 तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.
विदर्भ, मराठवाड्यात बर्याच ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
COMMENTS