वेब टीम : कोल्हापूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयएम खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर-मशीद खुली करा म्हणून हातात हात घालून...
वेब टीम : कोल्हापूर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयएम खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर-मशीद खुली करा म्हणून हातात हात घालून काम करताहेत
असे वाटत आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे आपण आपले सगळे सखे-सोयरे गमावत आहे.
कोरोनामुळे माझ्या सख्ख्या बहिणीचा नवरा, सख्ख्या भाचीचा नवरा गेला.
मला बहिणीचे सांत्वनही करायला जाता आले नाही.
एका एका घरातील दोन-तीन लोक कोरोनामुळे जात आहेत.
तरीही मशीद उघडा आणि देऊळ उघडा कशासाठी? हा अट्टहास धरला जात आहे.
धार्मिक स्थळे नक्की उघडली जातील.
याबद्दल अनेकांची अनेक मते आहेत. याचा अभ्यास करायला पाहिजे.
पण भाजप आणि एमआयएम मिळून हे जे काही काम करत आहेत ते लोकहिताचे नाही.
COMMENTS