वेब टीम : मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यामध्ये प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमीत भव्य राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट ...
वेब टीम : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यामध्ये प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमीत भव्य राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
आपल्या जीवनातील हा सर्वात महत्त्वपूर्ण दिवस व्यक्तिगत रूपाने घरी कुटुंबियांसह दिवाळी प्रमाणे साजरा करा.
हा सोहळा सामूहिकरित्या साजरा करणे मुख्यत्वे टाळा आणि कोरोना बाबत काळजी घ्या, असे राज्यातील जनतेला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले.
फेसबुक वर केलेल्या पोस्टद्वारे आमदार पाटील म्हणतात, हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीत भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी आपण सर्व एकजूट होऊन लढलो.
त्याच राम मंदिराचे भूमिपूजन मा. मोदी जी यांच्या हस्ते होत आहे. मंदिराचा भूमिपूजन सोहळा आपण मोठ्या स्तरावर आणि धुमधडाक्यात साजरा करू शकलो असतो, मात्र कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन हा सोहळा व्यक्तिगतरित्या घरीच साजरा करावा.
मंदिराचा भूमिपूजन सोहळा म्हणजे आपल्या घरातच दिवाळी आहे, असे समजून घरी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने साजरा करा.
आपले घर दिव्यांनी प्रज्वलित करा, गुढी उभारा, आपापल्या घरावर कंदील-पताका लावा, रांगोळ्या काढा आणि सर्व कुटुंबियांसह मिळून टीव्हीवर हा कार्यक्रम पहा.
मला विश्वास आहे की आपल्या सर्वांसाठी हा दिवस जीवनातील सगळ्यात अविस्मरणीय दिवस असेल.
COMMENTS