वेब टीम : मुंबई सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशी होत असलेले निर्माते संदीप सिंह यांच्या भाजपशी संबंधावर सचिन सावंत यांनी सवाल उ...
वेब टीम : मुंबई
सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशी होत असलेले निर्माते संदीप सिंह यांच्या भाजपशी संबंधावर सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केले होते.
त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडले .
विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात, अशा शब्दांत सावंत यांना फडणवीसांनी खडेबोल सुनावले .
“सचिन सावंत यांचं राज्य चाललं आहे ना? मग मुंबई पोलिसांनी या सगळ्यांना दूर का ठेवलं?
या आरोपींना चौकशीसाठी का बोलावले नाही? पहिल्या दिवसापासून आत्महत्या का म्हटले ?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला .
“संदीप सिंह दिग्दर्शक म्हणून विषय नाही, मी एखाद्या कार्यक्रमात गेलो असेन, पण त्याच व्यक्तीने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बनणाऱ्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती केली होती, अशीही बातमी काही जणांनी ट्विट केली होती.
सचिन सावंत अलीकडे फार अभ्यास करत नाहीत, त्यांना विधानपरिषदेवर पाठवत नाहीत, म्हणून ते फार निराशेतून बोलतात.” अशी टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा.
COMMENTS