कितीही वादळं आली तरी बिहारमध्ये भाजपचा रथ कोणी रोखू शकत नाही : फडणवीस


वेब टीम : नागपूर

भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्षकामात भाग घेतला असून बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाइन संवाद साधला आहे.


राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बिहारच्या भाजप प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. 


बिहारची निवडणूक ही पहिली डिजिटल निवडणूक आहे. 


या निवडणुकीचा प्रचारही डिजिटलच होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधा. 


सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून मतदारांच्या समस्या जाणून घेतानाच भाजपचे कार्यही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.


नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत मेहनत घेत आहेत. 


बिहारनेही मोदींना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही बिहारची जनता भाजपच्यामागे उभी राह्यला हवी, असं फडणवीस म्हणाले. 


बिहारमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. या तरुणांपर्यंत सोशल मीडियाच्यामाध्यमातून पोहोचण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


ही केवळ डिजिटल माध्यमातून होणारी निवडणूक नाही. तर बिहारचा भाग्योदय निश्चित करणारी निवडणूक आहे. 


बिहारचा नवा इतिहास लिहिणारी ही निवडणूक आहे. कितीही संकट आलं, कितीही वादळं आली तरी भाजपचा रथ कोणी रोखू शकलेला नाही. 


जेव्हा जेव्हा लोकशाहीवर आक्रमणं झाली तेव्हा तेव्हा सर्वात आधी बिहारमधूनच त्याविरोधात पहिला आवाज उमटला. 


बिहारमधूनच मोठी लढाई लढली गेली, असंही त्यांनी सांगितलं. 


यावेळी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयसवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post