वेब टीम : मुंबई कंगनाने या प्रकरणी बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरुन अनेक जणांवर आरोप केले होते. सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांन...
वेब टीम : मुंबई
कंगनाने या प्रकरणी बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरुन अनेक जणांवर आरोप केले होते.
सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबाबत खुलासा केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कंगनाने मांडलेले मुद्दे बरोबर असतील. सुशांतलाही घराणेशाहीचा त्रास होत असेल.
मात्र, कंगना ही सुशांतचे प्रतिनिधित्व करीत नाही. ती जे काही करीत आहे ते तिच्यासाठीच करीत आहे.
कंगनाचे ज्यांच्याशी वैर होते त्यांनी ती लक्ष्य करीत आहे. सुशांत प्रकरणात या मुद्द्याला प्राधान्य नाही.
यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या गँगने सुशांतला कसे संपविले हाच महत्वाचा मुद्दा आहे.
सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते.
या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते.
यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता.
COMMENTS