राज्यातील 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा...


वेब टीम : पुणे

राज्यातील विविध भागांमध्ये पावासाचा जोर वाढताना दिसत आहे. 


या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून आगामी ४८ तासांसाठी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भाग व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. 


तसेच, कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली.


”बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. 


त्याच अनुषंगाने कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


आगामी ४८ तासांमध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भागांसाठी व काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. 


या बरोबरच वाऱ्यांचा वेग ४५ ते ५५ किलोमीटर इतका असेल.” अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


मुंबईत पावसाची संततधार कायम असून, गुरूवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. 


मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. 


दुसरीकडे समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post