यंदा 'अशा' पद्धतीने साजरा होणार नवरात्रोत्सव आणि दसरा... राज्य सरकारचे निर्देश...वेब टीम : मुंबई

कोरोनामुळे यावर्षी ऑक्टोबरपासून 17 सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासह दुर्गा पूजा आणि दसरा राज्यात साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.


यंदा नवरात्री गरबा आणि दांडियाला बंदी घालण्याचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने दिले आहेत. 


नवरात्रोत्सवासाठी घरगुती देवीची मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या मूर्तीला चार फुट असेल, असे निर्बंध लादण्यात आले आहेत.


याबाबत गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत. 


त्यानुसार राज्यात गरबा, दांडियासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आलेली आहे. 


सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी आरोग्यविषयक उपक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. 


सार्वजनिक उत्सवाच्या जाहिरातींवरही निर्बंध आणत, स्वेच्छेने वर्गणी दिल्यास स्वीकार करण्यास सांगितले आहे. 


शक्यतो घरच्या घरी विसर्जन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post