मुंबईला पीओके नाही तर, सीरिया म्हणायला हवं होत... कंगना पुन्हा बरळली...वेब टीम : मुंबई 

मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर वाटते, असे कंगनाने विधान केल्यानंतर ठाकरे सरकार आणि तिच्यात चांगलेच युद्ध पेटले होते.


एवढेच नाही तर मुंबई महापालिकेने तिचे कार्यालयदेखील तोडले. 


कंगनाने आतापर्यंत अनेक मोठे कलाकार तसेच शिवसेना नेते संजय राऊत, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर तिने निशाणा साधला. 


हा वाद अजूनही शमलेला नसतानाच आता तिने राहुल गांधींना निशाणा केला आहे.


कंगना म्हणाली, “मला मुंबई सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते, तर माझ्यासाठी अपशब्द वापरण्यात आले. 


माझं कार्यालय उद्ध्वस्त केलं. माझं तोंड फोडण्यात येईल अशी धमकी मला देण्यात आली होती. मला शिव्या दिल्या होत्या. 


अभद्र टिप्पणी केली होती. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की, मला मुंबई पीओकेप्रमाणे वाटते. याचा फायदा उचलण्यात आला. 


मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पीओके म्हटलं होतं, पण मला आता असं वाटतं की, मी सिरीया म्हणायला हवं होतं. 


कारण जर राहुल गांधी यांनी भारताची तुलना सिरीयासोबत केली होती, तेव्हा त्यांना कोणी त्रास दिला नाही, त्यांचं घर तोडलं नाही. 


शेवटी या लोकांना कसली अडचण आहे?” असे म्हणून कंगनाने आता राहुल गांधींशी पंगा घेतलेला दिसत आहे. 


टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीत कंगना बोलत होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post