प्रकाश आंबेडकर यांच्यासह १२०० आंदोलकांवर गुन्हा दाखलवेब टीम : पंढरपूर
जमाव जमवून, मास्क न घालता, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. 

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी ऍड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश पारित केलेला आहे. 

असे असताना देखील या आंदोलनाच्या वेळी जमाव गोळा झाला होता. 

श्री. आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे (रा.मुक्ताबाई मठ, पंढरपूर), आनंद चंदनशिवे (रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (रा.अकोला), माऊली हळणवर (रा. इश्वरवठार, ता.पंढरपूर) आणि इतर अकराशे ते बाराशे जणांनी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही. 

त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी पोलिस हेडकॉन्सेटबल परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post