विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.. शाळा होणार सुरू.. केंद्र सरकारचे निर्देशवेब टीम : दिल्ली
9 ते 12 की वर्गात शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे.

 स्वेच्छेने व पालकांच्या संमतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शाळेत येतील. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. 

त्यासाठी काटेकोरपणे गाईडलाईन्सचे पालन करणेसुद्धा गरजेचे आहे.

पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील. 

शिवाय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू करण्यास परवानगी असेल. 

एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये. 

शाळेत एक वेगळी विलगीकरण खोली बनविली पाहिजे. जेणेकरून जर कोणी आजारी असेल तर तो आरोग्य सुविधा येईपर्यंत त्या खोलीत राहू शकेल. 

जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला पालकांसह स्थानिक आरोग्य यंत्रणेस माहिती द्यावी लागेल. 

मास्क, सॅनिटायझरचा कापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून केला जाणार आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाण्यासाठी 6 फूट अंतर राखावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post