ड्रग्ज प्रकरणात आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येणं बाकी आहे...वेब टीम : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. 


रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. 


सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. 


करिश्मासोबतच KWAN टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांनासुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. 


याव्यतिरिक्त या प्रकरणी दीया मिर्झाचंही नाव समोर आलं होतं. 


दरम्यान, यावर बोलताना आता या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचंच नावं येणं बाकी असल्याचं म्हणत मिश्कील टोला लगावाला. 


त्यांनी एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादात यावर भाष्य केलं.“ड्रग्ज प्रकरणात आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येणं बाकी आहे. 


ड्रग्ज ही केवळ आपली समस्या नाही. ही देशभराची आणि जगाची समस्या आहे. 


पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात ड्रग्जची समस्या होती,” असं राऊत म्हणाले. 


ड्रग्ज कनेक्शन केवळ चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नहाी. त्याची संपूर्ण देशात चौकशी होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.


यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फिल्म सिटी उभारण्याच्या निर्णयावरही भाष्य केलं. 


फिल्मसिटी देशभरात निर्माण होणार असतील तर त्यासाठी आम्हाला त्रास होण्याची गरज नाही. चित्रपट उद्योग मोठा आहे. 


लाखो लोकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. जम्मू काश्मीरमधूनही सरकारनं कलम ३७० हटवलं आहे. 


अनेक चित्रपटांचं चित्रिकरण जम्मू काश्मीरमध्ये होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशच का मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमध्येही फिल्म सिटी उभारावी, असंही राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post