अहमदनगर - मनमाड महामार्गाचे भाग्य उजळणार.. दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपये मिळणार...


   

वेब टीम : अहमदनगर

नगर मनमाड मार्गाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तातडीच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतानाच,या मार्गाच्या पुढील संपूर्ण कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून  निधी मिळवून काम पूर्ण करण्याची तयारी असल्याचे आश्वासन देवून तूर्तास आंदोलन न करण्याची विनंती आ.विखे पाटील यांना केली.

नगर मनमाड मार्गाच्या गंभीर परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री अशोक चव्हाण यांना पाठवून कोणत्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता.या पार्श्वभूमीवर मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंत्रालयात आ.विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.आ.आशुतोष काळे यांच्यासह जिल्हयाचे पालक सचिव नितीन करीर,रस्ते विभागाचे सचिव  देबडवार,मुख्य  अभियंता पद्माकर भोसले  जे.डी.कुलकर्णी,कार्यकारी अभियंता नरेंद्र  राजगुरू,आर आर पाटील  उप अभियंता अंकुश   पालवे एस. आर. वर्पे आदी उपस्थित होते.

मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत रस्त्याच्या सध्या निर्माण झालेल्या वस्तुस्थितीची माहीती  आ.विखे यांच्याकडून   जाणून घेतली.प्रशासकीय स्तरावरुन  या मार्गाच्या कामासाठी यापूर्वी  मिळालेली मंजूर आणि अर्थिक निधीच्या तरतूदीचा सविस्तर आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी घेतला.

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रस्त्याच्या परिस्थितीमुळे नागरीकांची होत असलेली आडचण,वाहतूकीला होणारा खोळंबा तसेच रस्त्यावरील  पाण्याला कोणतीही वहीवाट नसल्याने रस्त्याच्या कामाचे सातत्याने होणारे नूकसान मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले.प्रशासकीय स्तरावर याचा पाठपुरावा करूनही अधिकार्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याकडे आ.विखे यांनी बैठकीत मंत्र्याचे लक्ष वेधतानाच कहीही करा आणि  काम पूर्ण करुन मार्ग सुरळीत करून देण्याची आग्रही मागणी आ.विखे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post