मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारी कंगना गेली राज्यपालांच्या भेटीला...वेब टीम : मुंबई

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. 


या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 


या पार्श्वभूमीवर आज कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे .


कंगना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली, 


तर ४ वाजण्याच्या सुमारास ती राजभवनात पोहचली. 


यावेळी तिची बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती.


कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. 


त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. 


त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post