पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद... 'या' विषयावर होणार चर्चा

file photo


वेब टीम : मुंबई

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. 


या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 


कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. 


२३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 


या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होत असून ते राज्याच्या परिस्थितीबाबत माहिती पंतप्रधानांना देतील.


गेल्या काही आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्यानेच नरेंद्र मोदी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. 


या सात राज्यांमध्ये देशात सर्वाधिक फटका बसलेल्या दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशचा समावेश आहे. 


शनिवारी देशात ९३ हजार ३३७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. 


२४ तासांत एकूण ९५ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट सध्या ७९.२८ इतका झाला आहे.


दरम्यान जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post