भाजपनेही सोडली कंगनाची साथ... चौकशीचे समर्थन...वेब टीम : पुणे

सुशांत राजपूत मृत्यू तपासाला सद्या वेगळे वळण आले आहे. 


यात अनेक बॉलिवूड स्टार्सचे नाव समोर येत असून अंमली पदार्थाच्या सेवनाप्रकरणी आता मोठे धागेदोरे स्पष्ट होत आहेत. 


तर अभिनेत्री कंगना रनौतने सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरून मुंबई पोलिसांसह सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानाने कंगना विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच विकोपाला गेला होता.


दरम्यान, यासर्व प्रकरणात भाजप कंगनाचे समर्थन करत होते. 


मात्र, कंगना रनौतची जुनी मुलाखत व्हायरल झाल्यामुळे ती देखील अंमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर आली होती. 


यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांना पुण्यातील दौऱ्यात प्रश्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


प्रवीण दरेकर म्हणाले,” कंगना जर अंमली पदार्थांचे सेवन करत असेल तर तिची १०० टक्के चौकशी व्हायला हवी. 


आपल्या वैभवशाली बॉलिवूड क्षेत्रात नवे कलाकार येत असतील आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असतील तर याला पाठीशी घालण्याचे कारण नाही. 


त्यामुळे आपण काळजी घेऊन हिताचं नसणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली असून तिच्या चौकशीला कोणाचीही हरकत नसायला हवी असे देखील सांगितले.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post