कंगनाच्या विरोधात कुणी काहीच बोलू नका... मातोश्रीवरून आदेश?वेब टीम : मुंबई

आज कंगणा रणौतच्या कार्यालयात हतोडा चालवला गेला असून हि कारवाई मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे करण्यात आली आहे. 


कंगणाचं कार्यालय तोडल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अभिनेत्री कंगणा रणौतची बाजू घेतल्यानंतर शिवसेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले होते. 


आता कंगणाविरोधात कुणी काहीच बोलू नये असा आदेश मातोश्रीवरुन आल्याची माहिती आहे. 


या प्रकरणी आता शिवसेना आणि मुंबई महापालिकेने माघारी घेतल्याचं चित्र निर्माण झाले आहे.


अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. 


कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. 


यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून, तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.


आता अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. 


कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. 


उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापल्या बाजू हायकोर्टात मांडतील.


तर, माझ्या घरात कोणतंही अवैध बांधकाम नाही. तसंच कोरोना काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. 


फॅसिझम असंच काहीसं असंच असतं, असं ट्वीट कंगना रनौतने केलं आहे. 


कंगनाला सद्या सामोरे जावे लागत असलेल्या कठीण काळात सोबत असल्याची भूमिका भाजपचे दिग्गज नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. 


त्यांनी, ” कंगनाला विश्वास ठेवण्यास सांगा, तिच्या या कठीण काळात आम्ही सोबत आहोत” असे ट्विट स्वामींनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post