हवामानाचा इशारा.... पुन्हा तीन दिवस मुसळधार बरसणार...वेब टीम : मुंबई

महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे . 


मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल. 


त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


तर कोकणात समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी केला.


मुंबई -ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 


दरम्यान, शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत. 


राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणात पुढचे तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post