राज्य सरकारचा कंगनाला दणका... आता ड्रग्ज कनेक्शनची होणार तपासणीवेब टीम : मुंबई

शिवसेनेशी दोन हात करणा-या कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 


कंगना रणौत हीदेखील ड्रग्ज घेत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. 


राज्य सरकारने कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करायला सुरुवात केली आहे. 


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.


तसेच अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे कंगना ड्रग्ज घेत असल्याचे सागण्यात येत आहे. 


याच मुलाखतीच्या आधारावर कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्यात येणार आहे, असे गृृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 


शिवसेना नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. 


या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. 


यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post