सोनिया गांधीजी... या प्रकरणात हस्तक्षेप करा : कंगनाचे ट्विटवेब टीम : मुंबई

सोनिया गांधीजी तुमचं सरकार एका महिलेला त्रास देत असताना, 


कायदा आणि सुव्यवस्थेची चेष्टा करताना तुम्ही शांत होतात, याची इतिहास नोंद ठेवेल. 


तुम्ही हस्तक्षेप कराल याची अपेक्षा, असे ट्विट अभिनेत्री कंगना रणौत हिने केले आहे .


कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. 


तिच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. 


यामध्येच कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म या ऑफिसमध्ये बेकायदेशीर काम केल्याचं म्हणत बीएमसीनं  कारवाई केली. 


यात कंगनाच्या कार्यालयाचं नुकसान झालं असून तिनं ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post