शिवसेनेचा 'चाणक्य' देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला... दोन तास 'पाहुणचार'...वेब टीम : मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट घेतली आहे. दोन तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 


तर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. 


संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. 


तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. 


याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारलं असता तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असं त्यांनी म्हटलं आहे.  


टीव्ही नाईन मराठीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post