ज्या दिवशी मोदींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं त्याच दिवशी बाबरी खटल्याचा विषय संपला...वेब टीम : मुंबई

राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचे महत्त्व संपलं असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे .


राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपले 


जर कायदेशीर भूमिपूजन झालं आहे तर बाबरी केसच संपते. त्या न्यायालयाला आणि खटल्याला काही महत्व राहिले नाही, असे राऊत म्हणाले .


दरम्यान बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. 


बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post