मोदींजींच्या कट्टर विरोधकांच्या केले त्यांचे कौतुक... म्हणाला...वेब टीम : दिल्ली

मोदींनी केवळ सत्ता मिळवली नाही तर ती कायम राखली आहे. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना इतरांपासून वेगळे बनवते, असे मत जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याने एका मुलाखतीत व्यक्त केले.


कन्हैया कुमार मोदींचा विरोधक आहे. तो म्हणाला मी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही. मी पीएचडी केली आहे. 


एक अभ्यासक म्हणून कुठल्याही बाबतीत तटस्थपणे उणिवा पाहतानाच त्यामधील चांगल्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे.


अनुभव हे मोदींचे बलस्थान आहे असे सांगताना तो म्हणाला, नरेंद्र मोदींकडे जमिनीवरचा अनुभव आहे. 


अशा व्यक्तीला हटवणे खूप कठीण आहे. मोदींचा राजकीय अनुभव हीच त्यांची शक्ती आहे. 


गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकत नाही, हे मिथक नरेंद्र मोदींनी तोडले आहे. 


गरीब कुटुंबातील व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर पंतप्रधान बनू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.


मोदींच्या योजनांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. कोण म्हणणार की मुलीला वाचवून शिकऊ नका ? 


कोण म्हणेल की डिजिटल इंडिया होऊ नये ? कोण म्हणेल की शौचालय होऊ नये ? 


अजून एक बाब म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांचे खुल्या मनाने मूल्यांकन करतात. 


त्यांच्यातील चांगल्या बाबी स्वीकारतात, ही बाब त्यांना खास बनवते, असे कन्हैया कुमार म्हणाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post