जीडीपीत होणार घसरण... राहुल म्हणाले, भाजप सरकारची आणखी एक जबरदस्त कामगिरीवेब टीम : दिल्ली

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था बरी असल्याचं म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.


राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांचा पुरावा दिला आहे.


त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


यावरून राहुल गांधींना सरकारवर टीका केली. भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी.


पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post