वेब टीम : मुंबई पंकजा मुंडे यांनी टि्वट केलं आहे. शरद पवार यांच्या कामाबाबात पंकजा मुंडे यांनी प्रशंसा केली आहे. कोरोना, राज्यातील अतिवृष्ट...
पंकजा मुंडे यांनी टि्वट केलं आहे. शरद पवार यांच्या कामाबाबात पंकजा मुंडे यांनी प्रशंसा केली आहे.
कोरोना, राज्यातील अतिवृष्टी या काळातील शरद पवार यांचे दैारे, बैठका सुरू आहे. पवार यांच्या या कामाला मुंडे यांनी सलाम केला आहे.
पंकजा मुंडे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की “शरद पवार साहेब, hats off…
करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…
पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,”
ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात काल (२७ ऑक्टोबर) शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली.
या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते.
बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कार्यशैलीबाबत ट्विट केलं आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला.
कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. पंकजा मुंडे दुसऱ्या टि्वटमध्ये म्हणतात की आमचा पक्ष आणि विचारधारा वेगळ्या आहेत.
पण कठोर परिश्रम आणि मेहनत करणाऱ्या विषयी आदर केला पाहिजे, ही शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला दिली आहे.
ऊसतोड मजुरांच्या मजुरीत किती वाढ व्हावी, असा कुठलाच आकडा मी जाहीर केला नव्हता.
साखर महासंघाकडून आज जी सरासरी 14 टक्क्यांची वाढ मिळाली आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी पुण्यात बोलताना सांगितले.
ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
या वाढीला सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज दिली.
COMMENTS