भाजपच्या अडचणी वाढणार... संजय राऊत जाणार बिहारमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला...वेब टीम : मुंबई
ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे पडघम केव्हाच वाजलेले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय शिवसेनेने  घेतला आहे. खासदार संजय राउत यांनी याची घोषणा केली. 

शिवसेना बिहारमध्ये 30 ते 40 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. 

स्थानिक नेते हे 50 जागांवर निवडणूक लढवावी या मताचे आहेत असंही त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रसाचारासाठी जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

एवढेच काय तर, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त करणारे नुकतेच रिटायर्ड बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 

याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांड यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का? यावर बिहारमध्ये गेल्यानंतरच बोलणार, असे राऊत यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post