लेखक, पत्रकार संतोष शिंदे काळाच्या पडद्याआड...वेब टीम : अहमदनगर
ग्रामवार्ता या युट्युब चॅनेलचे संपादक, लेखक, पत्रकार संतोष शिंदे (वय - २९) यांचे दीर्घ आजाराने बुधवार (दि. ८ रोजी) निधन झाले. 
  संतोष शिंदे हे किडनी विकाराने गेल्या बारा वर्षांपासून त्रस्त होते. 

त्यांचे वारंवार डायलिसिस केले जात होते. एक महिन्यांपूर्वी त्यांना निमोनिया झाला होता. श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली. 

शिंदे यांनी ग्रामवार्ता हस्तलिखित उपक्रमापासून त्यांची कारकीर्द सुरू केली. दिवाळी अंक, दिनदर्शिका अशी मुद्रित साहित्य त्यांनी निर्माण केले. 

तसेच ग्रामवार्ता युट्युब चॅनेलच्या माध्यमातून डिजिटल प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. 

स्वतः अनेक व्याधींनी ग्रासलेले असतानाही त्यांनी सामाजिक, धार्मिक, साहित्य, क्षेत्रात भरीव  योगदान दिले आहे. 

असा हा अवलिया काळाच्या पडद्याआड गेल्याने नगर - पाथर्डी तालुक्यातील शिंदे यांच्या मित्र परिवार, नातेवाईक, कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 

त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. श्री क्षेत्र दगडवाडी या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक बहीण, भाऊ- भावजय, आणि पुतण्या असा परिवार आहे. 


संतोष वेदनामुक्त झाला - हभप मेटे महाराज
पत्रकार संतोष शिंदे यांच्यावर सन २००८ पासून डायलिसिस उपचार सुरू होते. अनेकदा जीवघेणे प्रसंग त्यांच्याबाबतीत घडले. अनंत वेदना त्यांना सहन कराव्या लागत असत. मात्र संतोष हा लढवय्या माणूस. एक तप हा माणूस जगण्याचा लढा देत होता. अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली, अन संतोष पहिली आणि शेवटची लढाई हरला ती मृत्यूसमोर. मात्र, त्या वेदनादायी आयुष्यातून संतोष कायमस्वरूपी मुक्त झाला. त्यांना शब्द सुमनांजली..!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post