राहुल गांधींना धक्काबुक्की : शरद पवार, सुप्रिया सुळे संतापले...वेब टीम : मुंबई

उत्तरप्रदेशमधील हाथरस  येथील घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. 


त्यातच हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 


तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.“उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. 


अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.” असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.तर, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 


सुळे यांनी म्हटलं आहे की, त्या ठिकाणी यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. 


पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उत्तरप्रदेश सरकारला केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post