अभिनेत्री पायल घोष आली जमिनीवर... मागितली बिनशर्त माफी...वेब टीम : मुंबई

चित्रपट अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्याविषयी समाज माध्यमांत आक्षपार्ह पोस्ट टाकून तिची बदनामी केल्याबद्दल आणखी एक अभिनेत्री पायल घोष हिने मंगळवारी रिचाची बिनशर्त माफी मागितली. 


हा माफीनामा स्वीकारून रिचाने पायलविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा मागे घेतला.


या दाव्यावर अर्धवट राहिलेली सुनावणी मंगळवारी सकाळी  न्या. ए. के. मेनन यांच्यापुढे सुरू  होताच 


रिचाच्या वकील अ‍ॅड. सवीना बेदी सच्चर व पायलचे  वकील नितीन सातपुते यांनी वादी व प्रतिवादीने हा वाद सामोपचाराने मिटविण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. 


त्यानुसार पायलने रिचाची बिनशर्त माफी मागणे व ती स्वीकारून रिचाने दावा मागे घेणे यासंबंधीचे दोघींच्या सहमतीचे संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.


 ते अधिकृतपणे नोंदवून घेऊन न्या. मेनन यांनी पायलविरुद्धचा दावा मागे घेण्यास रिचाला अनुमती दिली. 


रिचाने हा अब्रुनुकसानीचा दावा रिचाखेरीज ‘एबीएन तेलुगु’ ही वृत्तवाहिनी व चित्रपट निर्माते कमाल आर. खान यांच्याविरुद्धही दाखल केला आहे. 


पायलप्रमाणे या अन्य दोन प्रतिवादीने तडजोडीने समेट करण्याची तयारी न दाखविल्याने त्यांच्यावरील दावा पुढे सुरू राहील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post