वेब टीम : जळगाव भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास फायनल झाल्याची चिन्हे आहेत. खडसे यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट करत राजकी...
वेब टीम : जळगाव
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास फायनल झाल्याची चिन्हे आहेत.
खडसे यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा दावा खडसे यांनी केला आहे.
माझ्या सल्ल्यानुसार पाडवींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे सत्य आहे.
उदयसिंह पाडवी यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश करु याबाबत विचारणा केली होती.
त्यावर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असा सल्ला मी त्यांना दिला, असं एकनाथ खडसे म्हणाले.
तसंच अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला आहे.
खानदेशातील अनेक नेते आमदार आपल्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत का?,
या प्रश्नावर ‘मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर मी त्यांच्या प्रवेशावर काय बोलू’, असं खडसे म्हणाले.
तसंच मी आणखी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, असंही सांगायला खडसे विसरले नाही.
माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे.
अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.
COMMENTS