माझ्या सिनेमांमुळे जर बलात्काराच्या घटना वाढतायत तर माझे सिनेमेच पाहू नयेत...वेब टीम : मुंबई

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने हाथरस घटनेचा निषेध नोंदवतानाच, भारतीयांना  मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. 


आपल्याला अशा घटना थांबवायच्या असतील तर महिलांकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन बदलण्याची गरज तिने बोलून दाखवली होती.


त्यावर अनेकांनी तिला तिच्या चित्रपटांची आठवण करून दिली. 


यातल्या काहींनी मल्लिकाच्या चित्रपटांमुळेच भारतात बलात्कार होत असल्याचा जावईशोधही लावला आहे. 


एरवी कमेंट्स ना फारसं प्रत्युत्तर न देणारी मल्लिका मात्र या कमेंटने उखडली आहे.  


त्यावर ती म्हणते, 'लोकांच्या कमेंट्सपुढे हसावं की रडावं तेच कळत नाही. 


माझ्या सिनेमांमुळे जर बलात्काराच्या घटना वाढतायत असं काहीचं म्हणणं असेल तर त्यांनी माझे सिनेमेच पाहू नयेत.' अस ती म्हणाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post