भाजपला जोरदार झटका... नगरसेवकांचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश..वेब टीम : अहमदनगर

जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. 


तसेच १० ऑक्टोबरला तालुक्यातील इतर नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 


या वेळी प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, अमित जाधव, राजेश वाव्हळ, मोहन पवार हे उपस्थितीत होते.


जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह आकरा नगरसेवकांनी तीन महिण्यांपूर्वी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपले नगराध्यक्षपद कायम ठेवण्यात यश मिळविले होते. 


या वेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह राजश्री मोहन पवार, विद्या राजेश वाव्हळ या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. 


यामध्ये निमोणकर व पवार हे दोघे अपक्ष, तर वाव्हळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले होते. या तिघांनी माजी मंत्री राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता.


आता मात्र या तिघांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे महेश निमोणकर, राजेश वाव्हळ व मोहन पवार हे तिघेही चांगले मित्र आहेत. तिघांचाही जनसंपर्क मोठा आहे. 


महेश निमोणकर यांचे तरुण मंडळाच्या माध्यमातून शहरात मोठे नेटवर्क आहे. तर मोहन पवार हे कुस्ती क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांची स्वतः ची तालीम असून, तालुक्यातील अनेक नामावंत पहिलवान त्यांनी घडविले आहेत. 


राजेश वाव्हळ हे शांत संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. हे तिघे नेहमी ऐकमेका बरोबर असतात. या तिघा मित्रांनी पक्षांतराचा निर्णय ही ऐकाच वेळी घेतला, हे मात्र लक्षवेधी ठरले आहे. 


नगरपालिकेचा कार्यकाळ अवघ्या तीन महिण्यांचा राहिलेला असून, ता.१० जानेवारीला नगरपालिकेच्या नगरसेवकांना पाच वर्षे मुदत पूर्ण होत असताना अखेरच्या टप्यात होत असलेले पक्षांतर भाजपसाठी मोठा हदरा मानला जातो आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post