अहमदनगर : राष्ट्रवादी युवकची मंगळवारी कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकवेब टीम : अहमदनगर

मंगळवार, दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठक युवक प्रभारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.किशोर मासाळ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार व युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.


कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील युवक प्रदेश पदाधिकारी, युवक तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, युवक जिल्हा कार्यकारिणी यांचेसह युवक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


या बैठकीमध्ये युवक तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, युवक पदाधिकारी यांचेकडून आढावा घेण्यात येणार आहे.पक्षसंघटना वाढीसाठी युवक पदाधिकारी व कार्यकर्ता यांना योग्य सुचना व मार्गदर्शन केले जाणार आहे.सर्व युवक पदाधिकारी यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व सर्वाना विश्वासात घेऊन पक्षाची ताकद वाढीसाठी पक्षाच्या युवक संघटनेवर अधिक अधिकाधिक भर देऊन पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.युवक तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची कार्यकारिणीचाही आढावा घेतला जाणार आहे. कोरोना काळात युवक संघटनेने समाजोपयोगी केलेले मदतीचाही आढावा घेण्यात येणार आहे.


तरी कृपया कोरोना काळात सोशल डिस्टनंसचे पालन करून या युवक कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार व युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post