भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नव्हे तर आता पाकिस्तान राष्ट्रीय काँग्रेस म्हणावं लागेल...वेब टीम : दिल्ली

पाकिस्तानने कोरोनाची स्थिती चांगल्या प्रकारे हाताळली, असा हवाला देऊन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 


याबद्दल संताप व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुलवर टीका केली, हे राहुल लाहोरी आहेत!


राहुल गांधी यांनी भारताची  तुलना पाकिस्तान व अफगाणिस्तानसोबत केली 


असे सांगून प्रवक्ते संबित पात्रा म्हणालेत, भारताने राहुल गांधी यांचे नाव बदलले आहे. 


ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा विषय भाजपा व काँग्रेस असा नाही आहे. 


हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे? 


भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदाने राहतात. धर्माबाबत काहीही बंधन नाहीत. 


भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही त्याची तुलना पाकिस्तानशी करता. भारताविषयी तक्रारी करता. 


भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे, असे म्हणता. 


याच वेगाने काम सुरू राहिले तर ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ही लवकरच ‘पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post