पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ‘तो’ प्लॅन सक्सेस ---------------- लग्न समारंभात सापडले 43 कोरोना पॉझिटिव्ह पारनेर/प्रतिनिधी : जि...
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ‘तो’ प्लॅन सक्सेस
----------------
लग्न समारंभात सापडले 43 कोरोना पॉझिटिव्ह
पारनेर/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे.
आता धोका जास्त वाढताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका कोरोनाचे नवे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे विविध नियम लागू करण्यात आले आहेत. लग्न समारंभाबाबत अनेक कडक नियम करण्यात आले आहेत.
आता पारनेर तालुक्याच्या तहसीलदार यांनी रविवारी तालुक्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी लग्न समारंभ आणि त्या ठिकाणी होणार्या गर्दीवर लक्ष केंद्रीत केले. काल तालुक्यात 13 ठिकाणी लग्न समारंभ , साखरपुडा या ठिकाणी जमलेल्या 3 हजार 600 लोकांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यात 43 कोरोना बाधित आढळले आहे.
अशा प्रकार सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वर्हाडी मंडळींची करोना चाचणीचा पहिला प्रयोग जिल्ह्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी यशस्वीपणे राबविला.
पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार रविवारी पारनेर तालुक्यात महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने लग्न समारंभ, विवाह साखरपुडा कार्यक्रमाला हजर असलेल्याची सामुहिक करोना चाचणी करून घेतली.
तालुक्यात करोनाची दुसरी लाट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसंदिवस करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.
यासाठी लग्न संयोजकांना महसूल विभागाने सक्त ताकीत देत विवाह सोहळ्याला 50 पेक्षा जास्त नागरिक दिसले तर कडक कारवाईचा इशारा दिला. तसेच तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रम स्थळी मंगल कार्यालय या ठिकाणी करोना चाचणी कॅम्प लावण्याचे आदेश दिले.
यासाठी त्या-त्या ठिकाणचे मंडल अधिकारी, तलाठी यांनी ग्रांमपचायत कर्मचारी व महसुल यंत्रनेला घेऊन व आरोग्य कर्मचारी यानी कार्यक्रम स्थळी प्रत्येक उपस्थितीची करोना चाचणी केली. त्यात 13 ठिकाणी 3 हजार 600 नागरिकांच्या चाचणी करण्यात आली. यात 43 बाधित आढळून आले
COMMENTS