वासुंदे गावचे अध्यात्मिक वारसा सांगणारे ह.भ.प. दत्तात्रय राऊत महाराज यांचे निधन त्यांच्या जाण्याने वासुंदे गावची व राऊत कुटुंबाची न भरून न...
वासुंदे गावचे अध्यात्मिक वारसा सांगणारे ह.भ.प. दत्तात्रय राऊत महाराज यांचे निधन
त्यांच्या जाण्याने वासुंदे गावची व राऊत कुटुंबाची न भरून निघणारी हानी
वासुंदे गावचं अध्यात्मिक वारकरी भूषण काळाच्या पडद्याआड
पारनेर/प्रतिनिधी
वासुंदे गावचे अध्यात्मिक, वारकरी भूषण व ज्यांनी गावात धार्मिक उपक्रम राबविले आणि समाजाचे प्रबोधन केले असे
ह.भ.प.श्री. दत्तात्रय गणपत राऊत महाराज वासुंदे, पारनेर यांचे गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री पहाटे 3 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्याचे वय ८५ वर्षे होते. यांच्या निधनाने वासुंदे गावात व परिसरात शोककळा पसरली दशक्रिया विधी शनिवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता वासुंदे येथे होईल.
दरम्यान ह-भ-प दत्तात्रय महाराज राऊत हे वासुंदे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते गावात त्यांनी नेहमीच विविध अध्यात्मिक उपक्रम राबविले. गावात त्यांनी एकोपा ठेवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये समाजप्रबोधनाचे काम केले. गावातील भाऊसाहेब महाराज या मंदिरात ते नेहमी भजन कीर्तन व काकडा करत त्यांनी हयात असताना पंढरपूर आळंदी ताराबाद (महिपती महाराज) पिंपळनेर (निळोबाराय) या अध्यात्मिक तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या केल्या त्यांच्या निधनाने वासुंदे गावावर व परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. राऊत कुटुंबाचा न भरून निघणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
...
COMMENTS