--> विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष ! | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष !

विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष ! अहमदनगर :  नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व नगर शहराचे राष्ट...

विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष !


अहमदनगर : 
नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे संख्य सर्वश्रुत आहे. या दोस्तीला आता तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. विखेंचे विरोधक पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व जगतापांचे नगर शहरातील विरोधक शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एकमेकांशी मैत्रबंध जुळवले आहेत. त्यामुळे आता दक्षिण नगर जिल्ह्याच्या राजकारणात आता विखे जगताप विरोधात लंके काळे अशी राजकीय फाईट रंगण्याची चिन्हे आहेत. युवा नेत्यांच्या या दोन जोड्या परस्परांशी कसा शह-काटशह रंगवतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.


'भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यानी मागील लोकसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली आहे. त्यावेळी जगतापांनी विखेंच्या हेलिकॉप्टर सफारींवर तोंडसुख घेतले तर विखेंनी जगतापांच्या शौकाचे वाभाडे काढले. पण, त्या निवडणुकीत विखेंनी बाजी मारून जगतापांचा पराभव केला. मात्र, नंतर निवडणुकीतील कटुता विरून गेली व सहाच महिन्यांनी झालेल्या नगर शहर विधानसभा निवडणुकीत जगतापांनी विजय मिळवला. अर्थात त्या निवडणुकीत जगतामाना दिखनी साथ दिल्याच अजूनही बोलले जाते. पण आता तो इतिहास झाला आहे. जगताप शहराचे दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर व ते होण्याआधी त्यांनी भाजपचा महापौर मनपात बसवल्यावर भाजपचे खा. डॉ. विखे यांना केंद्र सरकारकडून नगर शहरात राबवायच्या योजनासाठी जगतापांची मदत आवश्यक होती. त्यामुळे त्यांनी जगतापाशी जुळवून घेतले व आता तर या दोघांची मैत्री भाजप व राष्ट्रवादीमध्ये चर्चे त आहे. 

विखेचे जगतापांशिवाय नगर शहरात पान हलत नाही एवढेच नव्हे तर दिखेच्या शहरातील बहुतांश विकास कामांची उदघाटनेही जगतापांच्या हस्तच होतात. विखेच्या विकास कामांचा आढावा कार्यक्रमात तर जगतापांना भाषण करण्यास अडचण येऊ नये म्हणूनच खा. विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा लाईव्ह सुरू असलेला कार्यक्रम म्यूट केला. अशा या मैत्रीच्या अध्यायाला आता तगडे राजकीय आव्हान उमे राहू पाहात आहे. आ. लंके व काळे यांनी एकमेकांशी घट्ट मैत्री करीत विखे-जगतापांच्या मैत्रीला राजकीय सुरंग लावण्याचा उद्देश ठेवला तर मग दक्षिणेतील राजकारण रगतदार होणार आहे. लंकेविखे व जगताप-काळे संघर्ष चर्चेत


पारनेर तालुक्यात आ. लंके याचे बस्तानळू होत चालले आहे. कोरोना काळातील त्यांच्या कोविड सेंटरचा लौकिक चर्चेत अजूनही आहे. पण विखे व लंके यांचा संघर्ष केके रज जमीन संपादनाच्या विषयापासून सुरू झालेला आहे. लष्कराच्या केके रेंज बाधितांना कोणी वाचवले. याचा श्रेयवाद विखे- लंके यांच्यात नेहमी सुरु असतो व त्यावरून परस्परावर राजकीय टीकाटिपणीही होत असते. यामुळे थेट पुढची नगर दक्षिणेतील खासदारकी विखेविरोधात लंके लढणार, अशाही चर्चा मध्यंतरी होत्या तर दुसरीकडे नगर शहरातील राजकारणात जगतापांच्याविरोधात काँग्रेसचे काळेही मागील सहा सात वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत असताना त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरु होता. 


त्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीत गेल्यावर त्यांनी थेट संघर्ष सुरु केला व आता काँग्रेसमध्ये असताना आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असतानाही काळी मनपा राजकारण व नागरी सुविधांच्या विषयांवरून जगतापांना टार्गेट करणे सोडलेले नाही. त्यामुळे नगर शहरातील जगताप व काळे संघर्ष तर पारनेरमधील विखे लंके संघर्ष नेहमीचा झाला आहे. तर दुसरीकडे विखे-जगताप मैत्री फुलत असताना लंके व काळे यानीही दिलजमाई करीत विखे- जगतापांना शह देण्याचे नियोजन सुरू केल्याचे चित्र आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील हे राजकीय बदल भविष्यातील राजकारणात उलथापालथ घडवण्याची चिन्हे दाखवणारी आहेत. राष्ट्रवादीत असले तरी जगताप आणि लके या दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, विखे जगताप विरोधात लंक काळे अशा भविष्यातील संघर्षाला राजकीय वर्चस्ववादाची किनार असणार असली तरी हा संघर्ष मात्र पारनेर व नगर शहराच्या राजकारणावरही परिणामकारक होण्याची शक्यता आहे.


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष !
विखे-जगताप विरोधात लंके-काळे यापुढे नगर दक्षिण मध्ये राजकीय संघर्ष !
https://lh3.googleusercontent.com/-_NJxJ_HJeP0/YRFInZbJwVI/AAAAAAAAEHQ/cIYk4jAneeo6NP9qRktnYIQFQSyOkyHmACLcBGAsYHQ/s1600/20210809_205120.jpg
https://lh3.googleusercontent.com/-_NJxJ_HJeP0/YRFInZbJwVI/AAAAAAAAEHQ/cIYk4jAneeo6NP9qRktnYIQFQSyOkyHmACLcBGAsYHQ/s72-c/20210809_205120.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/08/blog-post_38.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/08/blog-post_38.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content