अकोलेकरांची पूरग्रस्तांना मदत; जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांच्याकडे मदत केली सुपूर्त सामाजिक सेवाभाव जपत पूरग्रस्तांना अकोले राष्ट्रव...
अकोलेकरांची पूरग्रस्तांना मदत; जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांच्याकडे मदत केली सुपूर्त
सामाजिक सेवाभाव जपत पूरग्रस्तांना अकोले राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मदत
पारनेर प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली. त्याठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना व नागरिकांना मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हे ओळखून अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला आता अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार डॉ. किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे सिताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्षा स्वातीताई शेनकर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात मदत गोळा करण्यात आली. यामध्ये महिलांसाठी साड्या, लहान मुलांसाठी कपडे तसेच धान्य आदी वस्तू संकलित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अकोले तालुका उपाध्यक्ष अंकुश वैद्य व ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैद्य यांनी ही मदत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरीताई कोठावळे यांच्याकडे पारनेर याठिकाणी सुपूर्त केली. यावेळी सुपा ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई पवार उद्योजक सुधीर इंगळे सुमनताई कोठावळे स्वातीताई इंगळे साहिल सय्यद सुरज शिंदे प्रवीण आंधळे माया रोकडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राजेश्वरी कोठावळे यांनी अकोले तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तसेच अकोले तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडी यांचे अभिनंदन केले.
COMMENTS