दोन टेम्पोंची धडक टाकळी ढोकेश्वर येथील नगर-कल्याण महामार्गावर घटना भीषण अपघातात एक ठार, एक जखमी टाकळी ढोकेश्वर : नगर कल्याण राष्ट्रीय महा...
दोन टेम्पोंची धडक टाकळी ढोकेश्वर येथील नगर-कल्याण महामार्गावर घटना
भीषण अपघातात एक ठार, एक जखमी
टाकळी ढोकेश्वर :
नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्वरी (ता. पारनेर) शिवारात झालेल्या टेम्पो अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोन जखमी झाले.
काशिनाथ सखाराम इले यांनी फिर्याद दिली. टाकळी ढोकेश्वरी येथील नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. २६) पहाटे 8:30 च्या दरम्यान टाकळी ढोकेश्वरीपासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १ किलोमीटर अंतरावर दोन टेम्पोची धडक झाली. यामध्ये टेम्पो (क्र. एम. एच.२१ बी. एच. ८५३५) वरील क्लीनर डोक्याला गंभीर मार लागल्याने सोमीनाथ भाऊसाहेब सादरे (वय २१, रा. गाडे जळगाव, ता. जि. औरंगाबाद) हा जागीच ठार झाला. चालक दिनेश गणेश गोल्डे (रा. रेवगाव, ता. जि. जालना) याचे अपघातामध्ये दोन्ही पाय तुटले असून गंभीर जखमी झाला आहे. दुसरा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ८०४७) वरील क्लीनर सोमनाथ केदार व चालक दत्तात्रेय गीताराम वावरे हे जखमी झाले आहेत.
COMMENTS