म्हसोबा झाप येथे झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा ग्रामस्थांनी जाग्या केल्या शूरवीरांच्या आठवणी पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील उ...
म्हसोबा झाप येथे झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा
ग्रामस्थांनी जाग्या केल्या शूरवीरांच्या आठवणी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील उत्तरेकडील अतिदुर्गम भागातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत असलेल्या म्हसोबा झाप येथे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन झेंडावंदन करून ग्रामपंचायत कार्यालय म्हसोबा झाप व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे साजरा करण्यात आला यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या वीरांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला व राष्ट्र अभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहून काम केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी म्हसोबा झाप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच राणीताई गणेश वाळुंज ग्रामपंचायत सदस्य योगिताताई अशोक आहेर सखुबाई भाऊसाहेब भांडे संगीता भास्कर जाधव पद्माबाई भाऊ दुधवडे भाऊसाहेब पंढरीनाथ आहेर दादाभाऊ भाऊसाहेब पवार गोविंद नारासू आग्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच राणीताई गणेश वाळुंज बोलताना म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना स्वतंत्र भारतासाठी ज्या वीरांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण या दिवशी आपण करणे गरजेचे आहे.
COMMENTS