ढोकेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा पारनेर खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन अॅड. रघुनाथ खिलारी यांच्या हस्ते झेंडावंदन टाकळी ढोकेश्वर ...
ढोकेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
पारनेर खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन अॅड. रघुनाथ खिलारी यांच्या हस्ते झेंडावंदन
टाकळी ढोकेश्वर :
टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्य. विद्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या परीस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी पा.यांच्या हस्ते तसेच विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा वंदन करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विलासराव झावरे, माजी सरपंच शिवाजीराव खिलारी, विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता निवडुंगे, किरण उर्फ रामभाऊ तराळ, बापूसाहेब रांधवण, प्रा. विजय सोबले, शिक्षक बाळासाहेब निवडुंगे, अमोल ठाणगे, निलेश जासूद, अतुल सैद, प्रा. धनंजय लाटे, मल्हारी वाघसकर, राहूल झावरे, प्रा. आतिष झावरे, प्रा. अशोक गांगड, मोरेश्वर घोरपडे, बाबासाहेब जाधव, श्रीम. निलम खिलारी, श्रीम. वैशाली गायके, श्रीम. वर्षा शेळके, पवन कुटे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
झेंडावंदन कार्यक्रम झाल्यावर मा. मुख्याध्यापक प्रकाश इघे, एकनाथ झावरे, अॅड. रघुनाथ खिलारी, पर्यवेक्षक दत्तात्रय हराळ, प्राचार्य सुरेश जावळे यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. प्रा. आण्णासाहेब गंगावणे यांनी संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब निवडुंगे व अतुल सैद यांनी केले, प्रास्ताविक निलेश जासूद यांनी तर आभार अमोल ठाणगे यांनी मानले.
COMMENTS