वासुंदे येथील वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब जगदाळे यांचे निधन वनविभागात केली तीस वर्ष अविरत सेवा गुरुवारी वासुंदे येथे दशक्रिय...
वासुंदे येथील वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब जगदाळे यांचे निधन
वनविभागात केली तीस वर्ष अविरत सेवा
गुरुवारी वासुंदे येथे दशक्रिया विधी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब धर्माजी जगदाळे यांचे मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वासुंदे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. काही काळ आजारी असल्यामुळे व वृद्धापकाळाने बाळासाहेब धर्माजी जगदाळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी तसेच दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
वासुंदे परिसरामध्ये बाळासाहेब धर्माजी जगदाळे हे एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. वन विभागामध्ये काम करत असताना त्यांच्या कामाचा त्यांनी नक्कीच ठसा उमटवला वन विभागात काम करत असताना शासनाच्या वृक्ष संवर्धन तसेच वृक्षतोड बंदी हे शासकीय उपक्रम त्यांनी आपल्या सेवा काळामध्ये राबविण्याचा प्रयत्न केला. वन विभागात एक अनुभवी कर्मचारी म्हणून ते परिचित होते. वन विभागातील एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी वन विभागामध्ये काम करत असताना अनेक निवेदित वन अधिकाऱ्यांना तयार केले. व आपल्या वनविभागातील शासकीय कामाचा ठसा उमटविला. शिस्तप्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून वासुंदे परिसरामध्ये बाळासाहेब धर्माजी जगदाळे यांची ओळख होती.
अतिशय खडतर परिस्थितीतून व सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या कुटुंबाची मुहूर्तमेढ रोवली व संघर्षाने आपला संसार उभा केला. आपल्या मुलांना व नातवंडांवर त्यांनी चांगले संस्कार केले. त्यामुळे आज जगदाळे कुटुंब एक सुसंस्कृत कुटुंब म्हणून परिसरात ओळखले जाते.
बाळासाहेब धर्माजी जगदाळे यांच्या निधनाने जगदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एक अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावल्यामुळे न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वासुंदे परिसरातील सर्व ग्रामस्थ जगदाळे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब धर्माजी जगदाळे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम वासुंदे येथे दशक्रिया विधी स्थळावर गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. यावेळी ह.भ.प.डॉ. अर्जुन गोरखे (कुंभळी) यांचे प्रवचन सेवा संपन्न होणार आहे. अखेरचा निरोप देण्यासाठी दशक्रिया विधीनिमित्त सर्व नातेवाईक हितचिंतक मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
देह गेला हरवूनी । परि कष्ट अजरामर राहिले ।
अश्रु डोळ्यात साठवुनी सतत स्मरणात राहिले । सुर्य जरी डोंगराआड गेला ।
तरी संधिप्रकाश रेंगाळतो । सहवास जरी संपला । तरी आठवणींचा सुगंध दरवळतो ।
सेवानिवृत्त वनकर्मचारी स्वर्गीय बाळासाहेब जगदाळे हे पारनेर तालुक्यातील शिक्षक नेते गीताराम जगदाळे सर यांचे बंधू तर आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू जगदाळे तसेच पैलवान दत्तात्रय जगदाळे व पत्रकार गणेश जगदाळे यांचे ते मोठे चुलते होते.
COMMENTS