पाडळी रांजणगाव येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी. जिल्हा बँकेचे चेअरमन उदयराव शेळके यांना निवेदन. पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालु...
पाडळी रांजणगाव येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी.
जिल्हा बँकेचे चेअरमन उदयराव शेळके यांना निवेदन.
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या पाडळी रांजणगाव येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिहं कळमकर व सेवा सोसायटीचे चेअरमन आशाबाई राधु करंजुले यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन उदयराव शेळके यांना निवेदन देत केली आहे.
जिल्हा बँकेसंबंधी कोणत्याही कामासाठी ४ ते ८ कि.मी.चा प्रवास करून वाडेगव्हाणला ये-जा करावी लागते. त्यामुळे वेळेसह प्रवास खर्चही होतो. पाडळी रांजणगाव, कळमकरवाडी कडूस या गावांतील शेतकरी, कर्जदार, ऊस-उत्पादक खातेदार, ठेवीदार यांची संख्याही मोठी आहे. निराधार ,अपंग, व सरकारी योजनेच्या वृद्ध खातेदारांना प्रवासाची सोय नसल्याने मोठा त्रास सोसावा लागत आहे. नफा हा केंद्रबिंदू न ठेवता सेवा वृत्तीतून बँकेने येथे शाखा सुरू करावी.
जिल्हा बँकेचे चेअरमन उदयराव शेळके व संचालक प्रशांत दादा गायकवाड यांना शाखा सुरू करण्याची मागणी करताना पाडळी रांजणगावचे सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर पाडळी रांजणगाव सेवा संस्थेच्या चेअरमन आशाबाई राधु करंजुले उपसरपंच वैशालीताई करंजुले ग्रामपंचायत सदस्य संगम साठे
आप्पासाहेब साठे,आप्पासाहेब कळमकर, किरण साठे,सुभाष पाटील, विठ्ठलराव साठे, भाऊसाहेब उबाळे,भास्कर करं जुले,वसंतराव जाधव,अरुण उबाळे, राधुजी करंजुले,दीपक करंजुले( पत्रकार,)
उपस्थित होते.
बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी आम्ही गेली अनेक दिवस प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आजूबाजूच्या गावांचे ठरावही करून दिले आहेत. गावाची ती गरज असल्याने चेअरमन उदयराव शेळके व संचालक प्रशांतराव गायकवाड यांनी प्रयत्न करून पाडळी रांजणगाव येथे शाखा मंजूर करून घ्यावी.
विक्रमसिंह कळमकर सरपंच
आशाबाई करंजुले चेअरमन
पाडळी रांजणगाव हे अत्यंत सधन गाव आहे. या गावात पेन्शधारक जास्त आहेत तसेच सेवा सोसायटीची बँक पातळीवर १००% वसुली असते.बँकेची शाखा सुरू करावी, ही प्रलंबित मागणी आहे.अनेक वर्षांची ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून नव्याने येथे बँकेची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.
उदयराव शेळके चेअरमन जिल्हा बँक अहमदनगर
..
COMMENTS