वडगाव दर्या येथे शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय कार्यशाळा कार्यक्रम पारनेर/प्रतिनिधी : एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प-पारनेर आणि जिल्हा परीष...
वडगाव दर्या येथे शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय कार्यशाळा कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प-पारनेर आणि जिल्हा परीषद प्राथमिक शाळा वडगाव दर्या यांच्या संयुक्त विद्यमाने शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय कार्यशाळा प्रात्यक्षिक व गटकार्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक २८ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला.
बालकांचा शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक आणि भावनात्मक विकास,भाषा विकास,गणन पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयांतर्गत ही
कार्यशाळा पाच गटात घेण्यात आली. पिंपळगाव रोठा,वडगाव दर्या,कारेगाव,गारगुंडी,पिंपरी पठार,अक्कलवाडी या गटातील सर्व शिक्षक व अंगणवाडी ताई यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यशाळेत होता.
एकात्मिक बालविकास सेवा योजना पारनेर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी माननीय श्री लोंढे साहेब.पर्यवेक्षिका श्रीमती कमल राऊत मॅडम.वडगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संदिप नवले सर,या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली..सहाय्यक शिक्षक श्री अरुण ताठे सर आणि वडगाव दर्या येथिल अंगणवाडी शिक्षिका सौ अलका झरेकर मॅडम.यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
अंगणवाडी सेविका सुजाता फापाळे,फुलाबाई थोरात,शालुबाई शिंदे,शशिकला जगताप,ललिता नरवडे,यशोधा लवांडे,लता वाळुंज,प्रमिला शिंदे, तसेच मदतनीस जनाबाई परांडे आणि प्राथमिक शाळांचे सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात चे संपादक श्री शिवाजी खैरे सर यांच्या कडून या कार्यक्रमाचे विशेष कौतुक !
COMMENTS