गुरुदत्त पतसंस्थेला १ कोटी ७५ लाखांचा नफा : बा. ठ. झावरे पारनेर प्रतिनिधी : वासुंदे (ता. पारनेर) येथील श्री गुरुदत्त मल्टिस्टेट आर्थिक वर्ष...
गुरुदत्त पतसंस्थेला १ कोटी ७५ लाखांचा नफा : बा. ठ. झावरे
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे (ता. पारनेर) येथील श्री गुरुदत्त मल्टिस्टेट आर्थिक वर्षात एक कोटी ७५ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बा. ठ. झावरे यांनी दिली.
पतसंस्थेला गेल्या झावरे म्हणाले, की या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये २२ कोटी १९ लाख रुपयांची वाढ झाली. कर्जामध्येही १९ कोटी ५२ लाखांची वाढ झाली. संस्थेने मुख्य कार्यालयासह ७ शाखांच्या माध्यमातून १० वर्षाच्या कालावधीत ८१ कोटी २७ लाख रुपये ठेवींचा टप्पा पार केला. एकूण कर्जवाटप ६७ कोटी ९५ लाख रुपये, तर विविध बँकामध्ये १९ कोटी ३५ लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १४९ कोटी २२ लाख रुपयांचा झाला आहे.
थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश आले आहे. ग्रामीण व शहरी भागात संस्थेने अत्याधुनिक बँकिंगकडे वाटचाल करताना खातेदारांना अचूक व तत्पर सेवा देण्याच्या हेतूने, तसेच सभासदांना कोणत्याही शाखेतून रक्कम काढ-घाल करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित कोअर बँकिंग प्रणालीचा स्वीकार केला. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून क्यूआर कोडद्वारे खात्यात पैसे, तसेच मिनी एटीएम उपलब्ध करून दिले. संस्था लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचा विश्वास झावरे यांनी व्यक्त केला.
COMMENTS