--> भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर

 भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर पारनेर प्रतिनिधी(गणेश जगदाळे) :     शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले प...

 भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर







पारनेर प्रतिनिधी(गणेश जगदाळे) : 
   शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले पारनेर तालुक्यातील पोखरी येथील युवा नेतृत्व अमोल करंजेकर यांची नुकतीच भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना देण्यात आले. 
यावेळी अमोल करंजेकर हे संघटनात्मक पातळीवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व समस्यांवर चांगले काम करून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडतील अशी अपेक्षा संतोष वाडेकर यांनी व्यक्त केली. 
यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल करंजेकर म्हणाले की आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. आज शेतकऱ्यांचे दूध दर, ऊस दर, कांद्याचा भाव आदी प्रश्न गंभीर बनले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ही प्रयत्न करणार आहे. 


तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर काम करून संघटना तालुक्यात बळकट करण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष अमोल करंजेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
अमोल करंजेकर यांची भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, पोखरी गावचे ज्येष्ठ नेते निजामभाई पटेल, यांच्या समवेत संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे, तालुका कार्यकारणी सदस्य नाना काशीद, तालुका सचिव अन्सार पटेल, संतोष कों. वाडेकर,


 नंदन भोर, मंजाबापू वाडेकर, सचिन घेंबूड, पारनेर तालुका युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शुभम टेकुडे, नवनाथ फरतारे, विष्णू वाकळे, पोपट कसबे, बबन शिंदे, भगवान शिंदे, अण्णा शिंदे, शांताराम पवार, राजु दरेकर, पाराजी कारंजेकर, संजय फरतारे,  सोहम कसबे, संतोष शिदे, अमोल दरेकर, बबन खरै, आदी मान्यवर व पोखरी, कन्हेर, म्हसोबा झाप, गुरेवाडी, कामटवाडी, वारणवाडी, देसवडे या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4279,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2652,Politics,2715,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल करंजेकर
https://lh3.googleusercontent.com/-4-khXgZ8j7M/YuADVVVhLtI/AAAAAAAATSQ/9dsgSLutnvoehD7yWUGtjWHeXutu6-gyACNcBGAsYHQ/s1600/IMG-20220726-WA0019.jpg
https://lh3.googleusercontent.com/-4-khXgZ8j7M/YuADVVVhLtI/AAAAAAAATSQ/9dsgSLutnvoehD7yWUGtjWHeXutu6-gyACNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220726-WA0019.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_609.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_609.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content