संध्याताई सोनवणे यांचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त अनोखा उपक्रम नायगाव मधील सर्व शाळांना प्राथमिक प्रथमोपचार पेटी अहमदनगर विशेष प्रतिनिधी( गणे...
संध्याताई सोनवणे यांचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त अनोखा उपक्रम
नायगाव मधील सर्व शाळांना प्राथमिक प्रथमोपचार पेटी
अहमदनगर विशेष प्रतिनिधी( गणेश जगदाळे) :
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या पुणे विभागीय अध्यक्षा संध्याताई सोनवणे यांनी स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी दिन आपल्या जामखेड तालुक्यातील नायगाव या मूळ गावी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
अमृत महोत्सवी दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत संध्याताई सोनवणे यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना सोनवणे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून आपले दायित्व दाखवत असतात.
नायगाव या ठिकाणी त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष सामाजिक उपक्रम राबवून साजरी केले. त्यांनी गावातील सर्व शाळांसाठी प्राथमिक प्रथमोपचार पेटी भेट देत आदर्श उपक्रम राबवला आहे.
दरम्यान नेहमीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संध्याताई सोनवणे यांचे विद्यार्थी वर्गासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तसेच समस्यांसाठी नेहमीच काम सुरू असते. स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम राबवून संध्याताई सोनवणे यांनी दाखवून दिले आहे की मी नेहमीच समाजाप्रती बांधील आहे.
गावातील सर्व शाळांना प्राथमिक प्रथमोपचार पेटी देण्यात आली यावेळी नायगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ अशोक लेंडे, असरू उगले ,चंद्रकांत उगले, बाबासाहेब उगले, विनोद उगले, भीमराव लेंडे, नंदू उगले, भारत उगले, युवराज उगले, गणेश उगले, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच सर्व शाळांचे प्राचार्य कोल्हे सर, साळवी सर, मडके सर, लव्हाले सर, आदी मान्यवर तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नायगाव मधील देशभक्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नायगाव या ठिकाणी साजरा झाला.
COMMENTS